नंदुरबार – येथील स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या पुर्णाकृती (प्रेरक शक्तीची मुर्तीचे) पुतळ्याचा अनावरण सोहळा विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दिनांक १८ सप्टेंबर २०२१ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे.
श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील, गुजरातचे भाजपाचेे प्रदेशाध्यक्ष आर सी पटेल, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री अॅड. श्री. के. सी. पाडवी, आमदार गिरीश महाजन, आ. अमरीशभाई पटेल, खा. डॉ. हिनाताई गावीत, खा. श्रीमती रक्षाताई खडसे, आ. डॉ. विजयकुमारजी गावीत, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री जयकुमारजी रावल, माजी आ. चंद्रकांतजी रघुवंशी, माजी आ.शिरिष चौधरी, डॉक्टर सुधीर तांबे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी या नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील व्यापारी संकुलाचे उद्घाटनही विशेष सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनने दिली आहे. श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनने पी के अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित केलेला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा दौरा घोषित
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा दिनांक १७, १८ व १९ सप्टेंबर, २०२१ रोजीचा नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम घोषित झाला असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे. दौऱ्याचे स्वरूप असे-
शुक्रवार, दि. १७ सप्टेंबर २०२१ सागर निवासस्थान, मुंबई येथून रात्री 8 वा. नाशिक कडे प्रयाण,११वा. मोटारीने नाशिक, जि. नाशिक येथे आगमन व राखीव. शनिवार, दि. १८ सप्टेंबर २०२१ रोजी नाशिकहून सकाळी ७.३०वा. मोटारीने शहादा, जि.नंदुरबारकडे प्रयाण, ११.०0 वा.शहादा, जि. नंदुरबा येथे आगमन, ११.०० वा. स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन (श्री. दीपक पाटील, अध्यक्ष श्री. पी. के. अण्णापाटील फाऊंडेशन, शहादा)
सोईनुसार मोटारीने शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळेकडे प्रयाण.
3.30 वा. जनक व्हिला, शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे येथे आगमन व राखीव (श्री. अमरिशभाई पटेल, आमदार)