मुंबई – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काल 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले आहेत. त्यानुसार चार वर्षांखालील मुलांसाठी दुचाकीधारकांना ‘सेफ्टी हार्नेस’ वापरणे त्यानुसार आवश्यक राहणार आहे.
मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत , ज्यामध्ये केंद्र सरकार नियमांनुसार, चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी मुलांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते. या नियमांमध्ये सुरक्षा सामग्री आणि मजबूत हेल्मेटचा वापर त्याचप्रमाणे अशा दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले आहे. शिवाय ‘सेफ्टी हार्नेस’ वापरणे बंधनकारक राहील असे म्हटले आहे. म्हणजे ज्याप्रमाणे दुचाकी धारकांना हेल्मेट वरील खर्च पेलावा लागतोय आता त्याप्रमाणे या सेफ्टी हार्नेस चा देखील बोजा त्यांच्या खिशावर पडणार आहे. परंतु जिवाचा तुकडा म्हटले जाणारी मुले जपायची म्हटल्यावर एवढे तर करावेच लागणार.
अर्थात केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रसिद्ध झाल्यापासून एका वर्षानंतर हे नियम लागू होणार आहेत. केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर, मोटरसायकल चालकाने नऊ महिने ते चार वर्षे वयोगटातील मुलाला मागील सीटवर नेत असताना सुरक्षा उपायांचे पालन करावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
काय आहे ‘सेफ्टी हार्नेस’ ?
चार वर्षांखालील मुलाला मोटारसायकलच्या चालकाशी मुलाला जोडून (बांधून) ठेवण्यासाठी सुरक्षा हार्नेस वापरले जाईल. सेफ्टी हार्नेस म्हणजे काय तर मोटरसायकल चालक आणि लहान मुल दोघांना पट्ट्याने जोडणारा एक विशिष्ट पोषाख ! पुढे एक वर्षाने बंधनकारक ठरेल तेव्हा सर्व पालकांना हा पोशाख विकत घेणे भाग पडू शकते.
अधिसूचनेत म्हटल्यानुसार त्याचे स्वरूप असे की, मुलाने परिधान केलेले जॅकेट जे मोटरसायकलला अॅडजस्ट करता येण्याजोगे असेल. या जॅकेटचे पट्टे चालकाने परिधान केलेल्या खांद्यावरील लूपशी जोडलेले असेल. अशा प्रकारे, मुलाचे धड पूर्णत: संरक्षित करून चालकाशी कनेक्ट केले जाईल. जॅकेटच्या मागील बाजूस पट्ट्या जोडून दोन मोठे क्रॉसिंग-ओव्हर लूप तयार केले जातात जे प्रवासी आणि मुलाच्या पायांमधून जातात. हे सुरक्षा हार्नेस प्रकाश वाहून नेणारे, समायोज्य, जलरोधक आणि टिकाऊ; पुरेशा कुशनिंगसह जड नायलॉन/उच्च घनतेच्या फोमसह मल्टीफिलामेंट सामग्री असेल व 30 किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्याच्या क्षमतेसाठी डिझाइन केलेले असेल.
हे आहे सेफ्टी हार्नेसचे चित्र