वाचकांचे पत्र:
‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’त आपणही सहभागी व्हावे !
प्रति, मा.संपादक
महोदय,
सनातनच्या वतीने देशभरात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. आतंकवादी कारवाया, हिंदूंची मंदिरे बळकावणे, धर्मांतर, लव्ह जिहाद यांसारखे आघात हिंदू स्वातंत्र्यापासून सहन करत आहेत. अलीकडच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुखावणार्या, तसेच राष्ट्रीय अस्मितेला छेद देणार्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. अशा एक ना अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. एके काळी अवघ्या विश्वाचा आध्यात्मिक गुरु असलेल्या भारताची संपूर्ण विश्वाला धर्मशिक्षण देऊन रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. हे अनेक संत, द्रष्टे आणि भविष्यवेत्ते यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे ! अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, बालसंस्कार, आयुर्वेद, स्वभाषा, भावी आपत्काळात संजीवनी ठरणार्या बिंदूदाबनादी उपचारपद्धती आदी विषयांवरील 346 ग्रंथांच्या 17 भाषेतील 82 लाख 46 हजार प्रती छापण्यात आलेले आहे. धर्मप्रसाराच्या कार्यात सहभाग म्हणजे ईश्वरी कृपा संपादन करण्याचा सोपान ! म्हणूनच या अभियानात आपणही यथाशक्ती सहभागी व्हा ! यासाठी स्वत: ग्रंथ खरेदी करण्यासह मित्र-आप्तेष्ट आणि इतर परिचित यांनाही ग्रंथांची खरेदी करण्यासह त्यांचा प्रसार करण्यासाठी उद्युक्त करा ! sanatanshop.com
या संकेतस्थळावरून सनातनची ग्रंथसंपदा भारतभरात कुठेही ऑनलाईन विकत घेता येते.