नंदुरबार : लसीकरण प्रभावीपणे राबविले जावे तसेच कोणीही त्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन सर्व मार्ग अवलंबून लसीकरण मोहीम राबवत आहे. याचाच भाग म्हणून अस्तंभा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या लसीकरणासाठी कोठार ता.तळोदा तसेच जमाना फाटा,ता.अक्कलकुवा येथे आरोग्य विभागातर्फे कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरास जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी भेट दिली. तसेच यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना लसीकरणाचे महत्व समजावून लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास चौधरी, पोलिस निरीक्षक श्री केलसिंग पावरा, डॉ.हेमंत जिरे, डॉ. सुनील लोखंडे, आरोग्य सेवक देवेंद्र राठोड ,अशोक पाडवी, अधिपरिचारिका वैशाली कोकणी, हेमा पावरा, श्रीमती इरला गवळी आदी कर्मचारी उपस्थित होते.