आजचे पंचाग
दिनांक 16 सप्टेंबर २०२१
वार – गुरुवार, शुद्ध पक्ष दशमी
ऊत्तम दिवस. मात्र रात्री पासून भद्रा (विष्टी करण).
ज्योतिष फलित विशारद व वास्तू विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १६.९.२०२१ या दिवशी रात्री ८.५१ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०८ पर्यंत विष्टी करण आहे.
कलियुग वर्ष ५१२३ शालिवाहन शक १९४३
प्लवनाम संवत्सर, दक्षिणायन
वर्षाऋतू
भाद्रपद मास
शुद्ध पक्ष दशमी
दिनांक 16 सप्टेंबर २०२१
वार – गुरुवार, शुद्ध पक्ष दशमी
अयन – दक्षिणायन
नक्षत्र. – उत्तराषाढा (समाप्ती 17 रोजी पहाटे 4.9 वाजता)
योग – शोभन
करण – वणिज
चंद्र रास – मकर
दशमी समाप्ती 9.37 वाजता.
🙏🙏