आजचा दिवस
आज रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१
कलियुग वर्ष 5123 श्री शालिवाहन संवत (शक) 1943
प्लवनाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा शरद ऋतू
कृष्ण पक्ष
नक्षत्र रोहिणी, करण बव, चंद्र राशी वृषभ
चतुर्थी समाप्ती पहाटे ५.४४ (२५.१०.२०२१)
रोहिणी समाप्ती रात्री (२५.१०.२०२१) १.०१
उत्तम दिवस
संकष्ट चतुर्थी करक चतुर्थी, घबाड मुहूर्त
शास्त्रार्थ
संकष्ट चतुर्थी :प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’, असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदयसमयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २४.१०.२०२१ या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ८.४४ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करावा. या दिवशी गणपति अथर्वशीर्ष, श्री गणेशस्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये होतात.
करक चतुर्थी :आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी
करक चतुर्थी म्हणजे ‘करवा चौथ’ हे व्रत देहली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेश येथे केले जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य आणि समृद्धी यांसाठी पूर्ण दिवस उपवास करून प्रथम चंद्र अन् नंतर पती यांचे दर्शन घेतात. या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी मातीचे घडे पाण्याने भरून त्यांची पूजा केली जाते. या मातीच्या घड्यांना ‘करवा’ असे म्हणतात. २४.१०.२०२१ या दिवशी करक चतुर्थी आहे. उप
घबाड मुहूर्त :हा शुभ मुहूर्त आहे. २४.१०.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.०१ पासून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४४ पर्यंत आणि ३०.१०.२०२१ या दिवशी दुपारी २.४४ पासून ३१.१०.२०२१ या दिवशी दुपारी १.१६ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
(ज्योतिष फलित विशारद वास्तुविशारद अष्ट कर्म विशारद सौ प्राजक्ता जोशी, महर्षी अध्यात्म विद्यालय, गोवा यांनी प्रसारित केलेल्या माहितीवरून साभार)