नवी दिल्ली – सुमारे आठवडाभर चाललेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या समारोपासाठी आज दि.29 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभात लाइट शो अंतर्गत सुमारे 1,000 ड्रोन उड्डाण करणार असून एक अद्भुत नजारा त्यातून पाहायला मिळणार आहे. हा एक तांत्रिक प्रगतीचा टप्पा म्हटला जात आहे. चीन, रशिया आणि ब्रिटननंतर 1000 ड्रोनसह एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन करणारा भारत हा चौथा देश ठरेल.
ड्रोन शो 10 मिनिटांचा असेल आणि गडद आकाशात अनेक सर्जनशील संरचनांद्वारे स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील सरकारच्या कामगिरीचे प्रदर्शन करेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विकसित केलेल्या बॉटलॅब डायनॅमिक्स TDB कडून आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांत फ्लीट 1000 स्वार्म ड्रोन विकसित करू शकले, ही विशेष बाब आहे. 3D कोरिओग्राफ केलेल्या या लाइट शोसाठी 500-1000 ड्रोन असलेली स्वॉर्म सिस्टीम डिझाइन विकसित करण्याचे हे स्वदेशी तंत्र पूर्णत्वास आणतांना संबंधीत अभियंता आणि विद्यार्थी यांनी हाती असलेले बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बडे प्रस्ताव सोडून दिले, ही देखील उल्लेखनीय बाब आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश डॉ जितेंद्र सिंह यांनी काल 28 जानेवारी रोजी ड्रोन सादरीकरणाच्या प्रात्यक्षिकादरम्यान, मंत्री यांनी आज त्यांच्या निवासस्थानी ‘बोटलॅब’ स्टार्टअप टीमच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी सांगितले की, हा प्रकल्प देशातच स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आला आहे, ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही प्रकारच्या फ्लाइट कंट्रोलर्स (ड्रोनचा मेंदू), अचूक जीपीएस, या दोन्ही आवश्यक घटकांचा विकास करण्यात आला आहे. मोटर कंट्रोलर, ग्राउंड कंट्रोल स्टेशन (GCS) अल्गोरिदम इ.चाही समावेश आहे. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, बॉटलॅबने संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ एक अद्वितीय ‘ड्रोन शो’ ची कल्पना केली आहे. या प्रकल्पाचे यश हे आंतर-मंत्रालयीन समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे. ज्यामध्ये संरक्षण मंत्रालय, डीएसटी, टीडीबी आणि आयआयटी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शेवटच्या कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे. केंद्राच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भारताच्या स्टार्टअप ‘बॉटलॅब’ला तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) द्वारे निधी दिला गेला आणि IIT दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा प्रकल्प साकारला गेला. तन्मय वीव्हर, डॉ.सरिता अहलावत, सुजित राणा, मोहित शर्मा, हर्षित बत्रा, कुणाल मीना आणि इतर यावेळी उपस्थित होते.
बॉटलॅब डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अभियंते एकाच वेळी 1,000 ड्रोनसह आकाश उजळवणारे भारतातील पहिल्या व्यक्तींपैकी एक असतील याबद्दल आनंदी होते. डॉ. अहलावत यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांचे 3D कोरिओग्राफ केलेल्या ड्रोन लाइट शोसाठी 500-1000 ड्रोन असलेली पुनर्रचना करता येण्याजोगी स्वॉर्म सिस्टीम डिझाइन आणि विकसित करण्यासाठी प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.