नंदुरबार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नंदुरबार जिल्हा जनकल्याण समिती तर्फे आज गुरुवार रोजी सामुहीक कन्या पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समितीकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, आपल्या संस्कृतीमध्ये नवरात्रीत कन्या पूजन चे महत्व आहे. सामाजिक दायित्व जोपासत ग्रामीण क्षेत्रात सामूहिक 108 प्रगतिशील कन्या चे पूजन व गौरव कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. आज गुरुवार दिनांक : 14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दहिन्दूले बु|| ता. जिल्हा नंदुरबार येथे हा कार्यक्रम होणार आहे. सेवा सहयोगी म्हणून अभय अग्रवाल, खुराळ मेडिकल परिवार, नंदुरबार यांचा सहभाग राहणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी होऊन सेवा कार्याचा अनुभव घ्यावा; असेे आवाहन रा स्व संघ जनकल्याण समितीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जयकुमार वसावे, जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रीती बडगूजर यांनी केले आहे.