नंदुरबार – मागील आठवडाभर झालेल्या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 80 टक्के पाणी साठा झाला आहे. यामुळे नंदुरबार शहराला 1 ऑगस्ट 2022 पासून पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने घेतला आहे. नगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ही माहिती जाहीर केली व पाणी तुटवडा असताना नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांचे आभार मानले. उन्हाळा असतांनाच शहराला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटले होते. परिणामी अनेक दिवसापासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. पावसामुळे वीरचक धरणात पुरेसा पाणी साठा झाल्याने आता ही अडचण संपुष्टात आली आहे.