नंदुरबार – एकीकडे बिपरजॉय वादळामुळे निर्माण झालेल्या उष्ण लाटेतून आणि उकाड्यातून सुटका मिळवू पाहणारे लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत असतानाच यंदा पावसाने प्रचंड ताण दिला. ही प्रतीक्षा करून नागरिक आणि शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत अशातच हवामान केंद्राने खुशखबर देत 25 जून 2023 पासून पुढील पाच दिवस नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे.
डॉ. हेडगेवार सेवा समितीसमिती संचलित कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता. जि. नंदुरबार येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राने याविषयी भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, प्राप्त हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानात घट होत असून कमाल तापमान ३२ ते ३७ व किमान तापमान २३ ते २८ अंश सेल्सिअस राहील. पुर्वी दिलेल्या अंदाजानुसार २५ जुनपासुन जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कृषिहवामान सल्ला
शेतकरी बांधवांनी पुरेसा पाऊस झाल्यासच पेरणी करावी. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा.
*पिकनिहाय कृषिहवामान सल्ला व पशुपालनाविषयी* माहितीसाठी वरील हवामान आधारित कृषिसल्ला पञिका वाचावी.
पुढील हवामान अंदाज व कृषिसल्ला पञिका २७ जुन, मंगळवारी देण्यात येईल.