वाचकांचे पत्र:
आर्थिक लाभासमोर बीसीसीआयला शून्य वाटणारे राष्ट्रप्रेम !
प्रति
संपादक महोदय,
भारतातील राष्ट्रप्रेमींनी टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला होणारा क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे कित्येक भारतीय सैनिक हुतात्मे झाल्यावर देखील त्यांच्याशी क्रिकेटचे सामने का म्हणून खेळायचे ? असा प्रश्न येथे उपस्थित करावासा वाटतो. क्रिकेट सामन्यांद्वारे खोर्याने पैसे ओढणार्या भारतीय बीसीसीआयला हे न कळणे एवढे ते अजाण आहे का ? क्रिकेटचे सामने हे ‘नियोजित’च असतात; मात्र नियमांपेक्षा राष्ट्रीय अस्मिता महत्त्वाची नाही का ? सैनिकांनी अशा भारतीयांसाठी सीमेवर शहीद व्हायचं का ? तुमचे देशाप्रती असणारे कर्तव्य कधी बजावणार ? या सर्व प्रश्नांचे उत्तर बीसीसीआयने भारतीय जनतेला द्यावी असे वाटतेय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला बीसीसीआय मोठ्या प्रमाणात निधी पुरवते. बीसीसीआयने मनात आणले, तर तो पाकशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो; मात्र आर्थिक लाभाच्या मोहापायी बीसीसीआय असा निर्णय घेण्यास टाळत आहे हे राष्ट्रप्रेमी जनतेला मान्य होईल का ?
– डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ