नंदुरबार : डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता.जि.नंदुरबार येथे माता-पिता पूजन कार्यक्रम संपन्न झाला, तसेच आश्रमशाळेचा बहुउद्देशीय सभागृहाला स्वातंत्र्य सैनिक कै. आप्पासाहेब बाळकृष्ण दामोदर पाठक यांचे नामकरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी श्री कृष्णदास काशिनाथ पाटील (अध्यक्ष ,डॉ.हेडगेवार सेवा समिती), तर डॉ. प्रज्ञा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नंदुरबार तालुक्यातील जळखे येथे डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलीत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी माता-पिता पूजन कार्यक्रम आयोजित केला जातो यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात, यावर्षी या कार्यक्रमासोबतच शाळेतील बहुउद्देशीय सभागृहाला स्वातंत्र्य सैनिक कै. आप्पासाहेब बाळकृष्ण दामोदर पाठक यांचे नाव देण्यात आले.तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थी व विकास सहयोगिनी २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान सूर्यनमस्कार महायज्ञात योगदान नोंदवल्याने संस्थेच्या वतीने गौरव कारण्यात आला.
यावेळी संस्थेचे विश्वस्थ मा.पाटील भाऊ माळी, मा.सुखदेव अप्पा माळी,ज्येष्ठ सल्लागार मा.ललित दादा पाठक,सदस्य श्री बळवंत निकुंभ, प्रशासकीय अधिकारी श्री उमेश शिंदे ,समस्त पाठक परिवार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि विकास सहयोगी यांनी परिश्रम घेतले.