वाचकांचं मत :
इतिहासाचे विकृतीकरण थांबायला हवे !
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी मोठा अधिकोश लागणार होता आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकण्याची योजना आखली.
पण काही पुरोगामी विचारवंतांच्या दृष्टिकोनातून त्यांनी या छाप्याला लुट ठरविले, आणि त्यामुळे विकृत इतिहासाला चालना मिळाल्याचे लक्षात येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर स्वारी करायचे ठरवले होते तेव्हा त्यांनी तेथील मुजोर व्यापाऱ्यांना पत्र पाठवून पूर्वसूचना केल्या होत्या. ज्यांनी मागितलेली रक्कम जमा केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती, याचबरोबर तेथील सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी महाराजांनी घेतली होती. फक्त मस्तवाल झालेल्या व्यापाऱ्यांवरच त्यांनी बडगा उगारत हे सर्व धन सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी वापरण्यात आले होते. ‘मुजोर आणि गरीब जनतेला लुटणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खंडणी जमा करणे म्हणजे लुटमार होत नाही’, हे पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना कळत नाही, हे दुर्दैव आहे.
– रवींद्र हेम्बाडे, जळगाव