उघडपणे चालतोय गॅस सिलेंडरचा काळाबाजार

नंदुरबार – शहरातील भर वस्तीत मध्यवर्ती ठिकाणी अधिकृत सिलेंडर मधील गॅस काढून घेत अवैध गॅस सिलेंडर मध्ये भरून काळाबाजार केला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या छापे मारीत आढळून आले सुमारे 62 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून दोन जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इतके गॅस सिलेंडर काळाबाजार करणाऱ्यांनी आणले कुठून आणि संबंधित एजन्सी चालवणाऱ्यांना याचा थांगपत्ता कसा लागला नाही? हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

शास्त्री मार्केट येथे न्यु गुड्डी गॅस रिपेअरिंग सेंटर चे बंद दुकानाच्या पाठीमागे सिलेंडरचा हा गैर कारभार चालवला जात होता. पोलिसांनी अचानक जाऊन तपासणी केली तेव्हा भिंतीच्या आडोश्याला विनापरवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस बोगस सिलेंडर मध्ये भरणे चालू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद वसीम अब्दुल हमीद पिंजारी वर्ष वाहिद वय ३६ आणि अब्दुल खलील अब्दुल हक पिंजारी दोन्ही रा. शास्त्री मार्केट नंदुरबार ता.जि नंदुरबार हे दोघेही स्वतःच्या व लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे माहित असतांना देखील रबरी नळीच्या दोन्ही बाजुस गॅस रेग्युलेटर जोडून त्याचे एक टोक उलटे ठेवलेल्या लाल रंगाच्या गॅस सिलेंडर भरतांना व नमुद मुद्देमाल कब्जात बाळगतांना व घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचा काळाबाजार करतांना आढळून आले म्हणुन त्यांच्या विरोधात गुन्हा 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी नोंदवण्यात आला.

३६,०००/- रु. किं. चे HP कंपनीचे ९ सिलेंडर, २७,५००/- HP कंपनीचे ११ रिकामे सिलेंडर, २२,५००/- रु. किं. इंडेन कंपनीची ९ रिकामे सिलेंडर, ११,०००/- रु. किं. चे वेगवेगळया कंपनीचे ११ छोटे – सिलेंडर, ५००/- रु. किं. चे ११ छोंटे सिलेंडर, ५००/- रु. किं. ची ४ फुट लांबीची पिवळया रंगाची रबरी नळी, ५००/- रु. किं. ची काळया रंगाची रबरी नळी, ४०००/- रु किं. चे दोन डिजीटल वजन काटे असा एकुण १,०२, २००/- रु. किं. चा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि विकास गुंजाळ हे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!