एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशाकरिता 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नंदुरबार – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसुचित आणि आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु कोविड- १९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे व काही आस्थापनांच्या शाळा सुरु न झाल्याने अर्ज स्विकारण्यास २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुकांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये प्रवेशासाठी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना https://admission.cmrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन भरुन त्यासोबत मागील वर्षाचे इयत्ता सहावीत प्रवेश घेण्याकरिता पाचवीचे गुणपत्रक, सातवीत प्रवेश घेण्याकरिता सहावीचे गुणपत्रक, आठवीत प्रवेशासाठी सातवीचे गुणपत्रक तर नववीत प्रवेश घेण्याकरिता आठवीचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक राहील.
गुणपत्रकासंबधी शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारीक व संकलित मुल्यमापन झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचे संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे (मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, परीसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरीक शिक्षण) प्रत्येकी १०० गुणांचे गुणपत्रक तयार करावे. ज्या विद्यार्थ्यांचे फक्त आकारीक मुल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे आकारीक मुल्यमापनाचे विषयनिहाय प्राप्त गुण १०० मध्ये रुपांतरीत करावे. संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे प्रत्येकी १०० पैकी गुण विचारात घेऊन ९०० गुणांचे गुणपत्रक तयार करावे. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी वेबलिंकवर गुणपत्रक अपलोड करतांना गुणपत्रक १०० गुणांचे असल्याची खात्री करुन घ्यावी. शाळेकडून श्रेणी प्रदान केलेले गुणपत्रक गुणांमध्ये रुपांतरीत करुन घ्यावे. श्रेणी नमूद केलेले गुणपत्रक प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्यांचा सरल पोर्टलवरुन विद्यार्थी आयडी (१९ अंकी) माहित असणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा सरल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकून अर्जदार विद्याथ्र्यांचा पासवर्ड तयार करुन घ्यावा. पासवर्ड नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ एसएमएसद्वारे कळविला जाईल. विद्याथ्यांला ज्या इयत्तेमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्याची अचुक नोंद अर्जामध्ये करावी. विद्यार्थी आदिम जमातीमधील असेल तसे नमूद करावे. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरतेवेळी मोबाईल क्रमांक व जन्म तारीख टाकणे आवश्यक राहील. विद्याथ्र्यांच्या मागील इयत्तेची गुणदान केलेली गुणपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत आवश्यक असेल. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरलेले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच स्वतंत्र गुणपत्रक अपलोड करावे.
अर्ज भरल्यानंतर एखादी माहिती दुरुस्त करावयाची असल्यास विद्यार्थ्यांचा सरल क्रमांक व पासवर्ड टाकून पुन्हा लॉगीन करुन माहितीत दुरुस्ती करावी व अर्ज अपडेट करावा. प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा सर्वाधिकार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक या संस्थेस असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!