नंदुरबार : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी देण्यात आलेले 42 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि सीवायडीएच्या माध्यमातून कोविड रिलीफ कार्यक्रमांतर्गत हे सिलेंडर देण्यात आल्याची माहिती सीवायडीएचे अमोल शेवाळे यांनी यावेळी दिली.