‘ओमायक्रॉन’ रुग्ण महाराष्ट्रात 88, तर देशभरात 358

नवी दिल्ली – देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात  17 राज्यांमधे ‘ओमायक्रोन’ रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात म्हणजे 25 डिसेंबर 2021 च्या सकाळपर्यंत ‘ओमायक्रोन’ने बाधीत रुग्णसंख्या 358 झाली. तर महाराष्ट्रात आढळलेल्या ‘ओमायक्रोन’ बाधितांची संख्या 88 झाली आहे. 

‘एएनआय’ च्या वृत्तात म्हटले आहे की,  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ओमायक्रॉन’ ची ट्रान्समिसिबिलिटी जास्त आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे 1.5-3 दिवसात दुप्पट होतात, म्हणून आम्हाला कोविड योग्य वर्तनाने सतर्क राहावे लागेल.

    आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 21 डिसेंबर रोजीच राज्यांना पूर्वसूचना दिली आहे की, मोठ्या मेळाव्याचे नियमन करून रात्री कर्फ्यूसारखे निर्बंध लादावेत. बेड क्षमता आणि इतर रसद वाढवा आणि कोविड योग्य वर्तनाची कठोर अंमलबजावणी करा.

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतात आतापर्यंत एकूण 140 कोटी 31 लाख  मात्रा देण्यात आल्या आहेतभारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 77,516

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.22%आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.40%; मार्च 2020 पासून सर्वात अधिक

गेल्या 24 तासात 7,051 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,42,15,977

गेल्या 24 तासात देशभरात 6,650 नवीन रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.59%) गेले 81 दिवस 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.59%) गेले 40 दिवस 1% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 66.98 कोटी चाचण्या करण्यात आल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!