‘ओमायक्रॉन’ विषयी मोठ्ठा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी

नवी दिल्ली –  कोविड-19 चा नव्या स्वरूपातील विषाणू- ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने 26 नोव्हेंबर 2021 रोजी ओमायक्रॉन (B.1.1.529) म्हणून जाहीर केले आहे, या विषाणूविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली असून त्यात ‘ओमायक्रॉन’ डेल्टा पेक्षा धोकादायक असल्याचे पुरावे उपलब्ध होणे बाकी असल्याचे म्हटले आहे.

ओमायक्रॉन चा धोका अधिक वाढू शकतो का, किंवा आपल्या रोगप्रतिकारशक्तिला तो चुकवू शकेल का, याचा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही; असे स्पष्ट करणाऱ्या या माहितीत म्हटले आहे की, कोविड विषाणूचा हा नवा प्रकार समोर आल्यानंतर, ज्यावेळी संक्रमणात वाढ झाली तसेच कोविड महामारीच्या प्रमाणात, धोकादायक बदल लक्षात येऊ लागले, त्यावेळी, सर्व बाबींचे मूल्यांकन करुन, हा विषाणू ‘काळजीचे कारण’ असल्याचे जाहीर केले आहे. किंवा विषाणूची तीव्रता वाढणे किंवा वैद्यकीय आजाराच्या स्वरुपात बदल, किंवा सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता, किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या निदान पद्धती, लसी, उपचारात्मक पद्धती पुरेशा नसल्यास, जागतिक आरोग्य संघटना, अशा स्वरूपाच्या विषाणूला. ‘चिंताजनक’ म्हणून जाहीर करते.  (स्त्रोत: WHO)

ओमायक्रॉनला ‘काळजीचे कारण/‘चिंताजनक’असलेला विषाणूचा प्रकार म्हणून जाहीर करण्यामागे, त्यात होणाऱ्या उत्परिवर्तनाचा अभ्यास, वाढत्या संक्रमणशक्तिविषययी व्यक्त करण्यात आलेला अंदाज, कोविड-19 महामारीचा धोका अधिक वाढण्याची चिन्हे, जसे की पुन्हा संक्रमणाचा धोका, असलेले काही प्राथमिक पुरावे या सगळ्यांच्या आधारावर, या स्वरूपाचा विषाणू, ‘काळजीचे कारण’ असू शकेल, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र, ओमायक्रॉन चा धोका अधिक वाढू शकतो का, किंवा आपल्या रोगप्रतिकारशक्तिला तो चुकवू शकेल, याचा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.

आपण अशावेळी काय काळजी घ्यायला हवी? यावर म्हटले आहे की, आपण याआधी कोविडपासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेत होतो, तीच काळजी आताही घ्यायला हवी. आपण सर्वांनी योग्यप्रकारे मास्क लावला पाहिजे, लसीच्या दोन्ही मात्रा घ्यायला हव्यात. शारीरिक अंतर राखायला हवे, तसेच सभोवतालच्या वातावरण हवा खेळती असायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!