कपाशीच्या शेतातून 112 किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची शहादा तालुक्यात कारवाई

नंदुरबार – शहादा तालुक्यातील सटवाणी गावात पोलिसांनी एक कापसाचे शेत पिंजून काढत 112 किलो 33 ग्रॅम वजनाची व 7 लाख 86 हजार 331 रुपये किंमतीची एकूण 150 गांजाची झाडे जप्त केली.  ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो, तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले.
 जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी गांजा, अफू इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक, लागवड करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दिनांक 2/10/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत शहादा तालुका हद्दीतील सटीपाणी गावात एका इसमाने कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी प्राप्त झाली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व त्यांचे अमलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी सटीपाणी गावाचे शिवारात कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांनी त्यास पाठलाग केला असता तो शेजारी असलेल्या नाल्यातून जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण शेती पिंजून काढली असता तेथे 112 किलो 33 ग्रॅम वजनाचे 7 लाख 86 हजार 331 रुपये किंमतीची एकुण 150 गांजाची झाडे मिळून आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला. तसेच आरोपी नामे गणेश लकड्या भोसले ( पावरा) रा. सटीपाणी ता.शहादा जि. नंदुरबार याच्विरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उप निरीक्षक श्री. छगन चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, राकेश वसावे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, रमेश साळुंके, पोलीस अमलदार विजय डिवरे, राजेंद्र काटके, अभिमन्यु गावीत, चेतन चौधरी, शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उप निरीक्षक काळुराम चौरे, पोलीस हवालदार अमृत पाटील, रतन पावरा, दिनकर चव्हाण यांचे पथकाने केली असून मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो, तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!