नंदुरबार – येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल मध्ये येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत स्पोर्ट्स कराटे असोसिएशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेल्ट परीक्षेत यश मिळवले यावेळी येलो बेल्टमध्ये रुचिता पाटील ,अथर्व विसपुते ,पूर्वी बीलाडे, व ब्ल्यू बेल्ट ,रुद्र मोरे ,विहान छिकारा आणि ब्लॅक बेल्ट गौरव पवार शुभ लखलानी, ओम सूर्यवंशी प्रणव अहिरे , सीनियर ब्लॅक बेल्ट मध्ये दीपाली साळुंखे ,शुभम कर्मा यांनी यश मिळवले या यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे संघटनेचे अध्यक्ष राजेशभैय्या परदेशी,उपाध्यक्ष मीनल वळवी,सुरेन्द्र छिकारा यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आली. बेल्ट ग्रेडेशन परीक्षे करिता निरीक्षक म्हणून ,चंदना लोढा, कृष्णा बैसाणे,नवदीप राजपूत खुशी देसले, हर्षवर्धन वळवी, यांनी काम पाहिले या यशस्वी विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कराटे जिल्ह्याचे सचिव व कराटे प्रशिक्षक दिनेश बैसाणे व शिहान परमजीत सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.