नंदुरबार – काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या सर्व विभागांसह उत्तर महाराष्ट्र विभागातील प्रभारी आणि सह प्रभारी यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यांची यादी घोषित केली आहे. नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे प्रभारी म्हणून राजाराम पानगव्हाणे तर सहप्रभारी म्हणून रणजीत पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या नियुक्त केल्या असल्याचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी म्हटले आहे.
उत्तर महाराष्ट्र विभागातील नियुक्त्या याप्रमाणे :
मालेगाव शहर प्रभारी तारीक फारुकी, सहप्रभारी रमेश कहानडोळे.
धुळे शहर आणि धुळे ग्रामीण प्रभारी डॉ. शोभा बच्छाव, सहप्रभारी राहुल दिवे.
नंदूरबार प्रभारी राजाराम पानगव्हाणे, सहप्रभारी रणजीत पावरा.
जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहर प्रभारी एम. एम. शेख, सहप्रभारी युवराज करंकाळ, दीप चव्हाण.