नंदुरबार – मानाचा व नवसाला पावणारा म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री काका गणपती मंडळातर्फे आज पंचधातूंपासून बनवलेल्या व सोन्याचा मुलामा असलेल्या 300 किलोहून अधिक वजनाच्या मूर्तीची आज श्री गणेश जयंतीनिमित्त विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नंदुरबार शहरात मानाच्या दादा, बाबा, काका गणपतींची ऐतिहासिक परंपरा आहे. त्यापैकी देसाईपुरा भागातील काका गणपती मंडळ एक आहे. या मंडळाच्या सदस्यांनी मूर्ती स्थापनेचा संकल्प केला होता. त्यानुसार आग्रा येथील अलिगड मूर्ती कार्यशाळेत तयार करण्यात आली असून मुषकासह सुमारे ३८० किलो मूर्तीचे वजन आहे. उल्लेखनीय असे की मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संतोष (महाराज) मधुकर देवळालीकर यांनी आपल्या मात्या-पित्यांच्या स्मरणार्थ श्री काका गणपती मंडळास एक लाख २१ हजार १११ रुपयाची भरीव देणगी दिली आहे.
मंगळवारी दुपारी जल अधिवास, बुधवार दि.२ फेब्रुवारी रोजी धान्य अधिवास करण्यात आला तर गुरुवारी सकाळी ११ वाजता मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. आज शुक्रवारी गणेश जयंतीनिमित्त चल प्राणप्रतिष्ठा मंत्र उपचार तसेच गणेशयाग, महायज्ञ, अथर्वशिर्षाचे पठण असे विविध विधी सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पाडण्यात आले. तसेच सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले.
पूजेचे यजमान म्हणून जितेंद्र प्रदीप सोनार आणि सौ. धनश्री जितेंद्र सोनार होते. पुजेचे आचार्य म्हणून संतोष देवाळालीकर, तसेच पुरोहित प्रमोद जोशी, श्रीकांत जोशी, हेमंत त्रिवेदी, तुषार उदारे यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी श्री काका गणपती मंडळाचे अध्यक्ष सागर प्रदीप सोनार, उदय कासार, सदस्य सौ. किरण सोनार, शेखर सोनार, भरत सोनार, रुपेश सोनार, जयेश सोनार, प्रकाश सोनार, कैलास सोनार, सिद्धार्थ सोनार, प्रकाश सोनार, आनंद सोनार, दीपक सोनार, तन्मय सोनार, संजय राजपूत, प्रशांत सोनार, गीरीराज पाटील आदींसह परिसरातील भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.