काय आहे ‘हलाल’मुक्त दिवाळी अभियान? काेण करतंय ‘हलाल’ प्रमाणपत्राची सक्ती ?

नंदुरबार – जीवनावश्यक वस्तूंसाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यायला भाग पाडणे हा इस्लामीकरणाचा भाग असून ‘हलाल’ची व्यवस्था निर्माण करणे आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारावर इस्लामी बँकेला प्रोत्साहन देऊन मजबूत करणे सध्या चालू आहे. याविषयाकडे जागरूकतेने पाहायला हवे; असे विचार हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘या वर्षी साजरी करा हलाल मुक्त दिवाळी !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात व्यक्त करण्यात आले. यामुळे हलाल प्रमाणपत्राचा विषय लोकचर्चेत आला आहे.
या परिसंवादाची माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘सीएट टायर्स’च्या जाहिरातीमध्ये ‘रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नसतात’ असा सल्ला आमीर खान हिंदूंना देतो; मात्र ‘रस्ते नमाज पडण्यासाठीही नसतात’ याविषयी तो काही बोलत नाही. ‘फॅब इंडिया’च्या जाहिरातीतून दिवाळीला ‘जश्‍न-ए-रिवाज’ असे संबोधले आहे. हिंदूंच्या परंपरांना ‘इस्लाम’कडे नेणे, तसेच त्यानंतर तिथे ‘हलाल’ची व्यवस्था निर्माण करणे आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारावर इस्लामी बँकेला प्रोत्साहन देऊन मजबूत करणे चालू आहे. याविषयाकडे जागरूकतेने पाहायला हवे. भारतात मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन’ व्यापारातून कोट्यवधींचा व्यापार होतो. यामध्ये दिवाळीसारख्या सणांत हिंदु ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे आम्ही ‘हलाल मुक्त दिवाली’ ही मोहिम राबवत असून या मोहिमेत संपूर्ण समाजाने सहभागी व्हावे. या दिवाळीला ‘हलाल’ प्रमाणित उत्पादने आणि हिंदु परंपरांचे इस्लामीकरण करणार्‍या आस्थापनांची उत्पादने न घेता यंदाची दिवाळी ही ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘या वर्षी साजरी करा हलाल मुक्त दिवाळी !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
       श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, हिंदु समाजात ‘हलाल’विषयी अजूनही अज्ञान आहे. भारतात FSSAI आणि FDI या प्रमाणपत्र देणार्‍या भारत सरकारच्या संस्था असतांना इस्लामी संस्थांकडून ‘हलाल’चे प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ? ‘हलाल’ आता केवळ मांसाहारी पदार्थापुरती मर्यादित राहिले नसून जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ, मिठाई, शीतपेये, रुग्णालये, निवासी संकुले इथपर्यंत पसरले आहे. ‘हलाल’चे हे सर्व धन इस्लामिक बँकांकडे जात आहे. ‘हलाल व्यवस्था’ ही अल्पसंख्याकांची हुकूमशाही आहे. जिथे हुकूमशाही आहे, तिथे आतंकवाद आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
         विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बंसल म्हणाले की, ‘जमात-ए-इस्लामी’सह साधारणत: 8 ते 10 कट्टरतावादी इस्लामी संघटनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र देण्याचा अधिकार दिला आहे. ‘हलाल’च्या पैशांचा वापर आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. हे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील घटनांतून समोर आले आहे. ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्‍या सर्व आस्थापनांवर बहिष्कार करायला हवा आणि अशी आस्थापने, संस्था यांचे खरे स्वरूप उघड करायला हवे. यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
          सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल म्हणाले की, ‘हलाल’कडे जाणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याविषयी संभ्रमावस्था आहे. किंबहुना चुकीच्या गोष्टींसाठी याचा वापर केला जात असल्याचे लेख प्रसारमाध्यमांतून वाचनात आले आहेत. ‘हलाल’च्या समांतर अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे, फक्त दिवाळीतच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर ‘हलाल’पासून स्वत:ला वाचविणे आवश्यक आहे. आम्ही अधिवक्ता म्हणून ‘हलाल’विरोधात न्यायालयीन मार्गाने लढा देऊ, असेही अधिवक्ता गोयल म्हणाले. ही माहिती हिंदु जनजागृती समितीने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!