नंदुरबार – प्रत्येक सामान्य माणसाच्या आतला आवाज बनवून कोणी पत्रकार लेखक किंवा कलाकार मांडणी करतो आणि सामान्य जनतेच्या भावनेला न्याय देतो तेव्हा निश्चितच लाखो लोकांच्या वाचकांच्या दर्शकांच्या मनाला ते भिडते आणि डोक्यावर घेतले जाते. “सच तक” नामक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने केलेल्या वार्तांकनाचा व्हिडिओ सध्या अशाच कारणामुळे जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हाट्सअप फेसबुक व अन्य सोशल मीडियातून मागील सहा दिवसात मोठ्या प्रमाणात त्याचे प्रसारित होणे चालूच आहे. लाखोच्या संख्येने दर्शक त्याला पहात आहेत.
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी अटकेत असताना व अमली पदार्थविरोधी पोलिस पथक कारवाईची पूर्तता करत असताना चक्क त्या प्रसंगी कार्यालयाबाहेर एका चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा व बनावट पोलिस उभे करून खऱ्या पत्रकारांची अडवणूक करण्याचा अजब प्रकार घडवला गेला. हा संताप करायला लावणारा प्रकार काय आहे ; याची माहिती देत अत्यंत खरमरीत तिखट शब्दात भाष्य करणारा हा व्हिडीओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. ‘सच तक’चा तो व्हिडिओ “एनडीबी न्युज वर्ल्ड” च्या दर्शकांसाठी येथे देत आहोत…