नंदुरबार- निवडणूक पार पडली निकालही लागला तरीपण कट्टर कार्यकर्त्यांचा इलेक्शन फिवर संपलेला नाही. कोणत्या गावात कोणाला किती मतदान झाले कोणत्या गटात कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली कोणामुळे कसे विभाजन झाले यावर त्यांचा काथ्याकूट सुरू झाला आहे त्याचप्रमाणे कोणापेक्षा कोणता पक्ष वरचढ यावर शाब्दिक शेरेबाजी देखील चालली आहे.
या संदर्भाने महत्त्वाच्या उमेदवारांच्या गटात आणि गणात झालेले मात विभाजन रंजक आहे. वाचकांच्या माहितीसाठी त्याचे तक्ते येथे जसेच्या तसे जोडले आहोत.
दरम्यान जिल्ह्यातील पंचायत समिती गणांच्या पोट निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीला फटका बसला असून काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. पंचायत समितीच्या 14 गणांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने ५, काँग्रेसने ४, भाजपाने ४, राष्ट्रवादीने १ अशा जागा जिंकल्या. गणातील विजयी उमेदवार असे:
सुलतानपुर- पाटिल वैशाली किशोर- काँग्रेस
जावदे तबो- पटले निमा ओरसिंग- काँग्रेस.
खेडदिगर- पाटिल संगिता शांतिलाल- काँग्रेस.
मंदाणे- पवार रोहिणी दिनेश – काँग्रेस.
मोहिदे तह- पाटिल कल्पना श्रीराम- भाजपा.
पाडळदे – पाटिल सुदाम मंगळू- राष्ट्रवादी काँग्रेस.
डोंगरगाव- याईस श्रीराम धनराज- भाजपा.
शेल्टी – पाटिल किशोर छोटूलाल- भाजपा.
गुजरभावाली- शितल धर्मेद्र परदेशी- शिवसेना.
पातोंडा- भिल दिपमाला अविनाश- शिवसेना.
होळ तर्फे हवेली- मराठे सिमा जगन्नाथ- भाजपा.
नांदर्खे- प्रल्हाद चैत्राम राठोड- शिवसेना.
गुजरजांभोली- तेजमल रमेश पवार- शिवसेना.
कोराई- अश्विनी दिलिप वसावे- शिवसेना.