नंदुरबार – अत्यंत किरकोळ वादातून संतप्त मटण विक्रेत्याने एका तरुणाच्या पोटात सुरा खुपसल्याची घटना शहादा येथे घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहाद्यातील तकिया बाजारातील रहिवासी समीर ईस्माईल खाटीक (वय २५) या चहा विक्रेत्याच्या अंगणात विटा दगड पडलेल्या होत्या. त्या उचलून घ्याव्या, अशी सूचना त्याने सलमान मुस्ताक खाटीक (वय ३०) याला केली. अब्दुल हमीद चौकातच सलमान हा मटन विक्रीचे दुकान चालवतो. दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ९.४५ वा. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा अब्दुल हमीद चौकात A-१ मटन शॉपी समोर रोडवर सार्वजनिक जागी सलमान याने शिवीगाळ करून अंगावर धावून जात समीर ईस्माईल याच्या पोटात मटन कापण्यासाठी वापरला जाणारा सुरा खुपसला; असे समीर याने फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी समीर बी. डी. पाटील हॉस्पीटल शहादा येथे अॅडमीट असून उपचार सुरू आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप आराक हे करीत आहेत.