कोणाच्या हातचे बनवलेले खातोय? त्या आहाराचा स्तर कोणता? लक्षात घेण्याला ‘हे’ आहे महत्व..

मुंबई – बाहेरचे असो की घरचे असो, आपण रोज जेवणातून जो आहार घेतो, त्या आहाराला अध्यात्मिक स्तर असतो आणि तसे नसेल तर त्यातून निर्माण होणारी नकारात्मकता परिणाम घडवत असते; याविषयी केलेले सखोल संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने हे आहार या विषयावरील संशोधन ऑस्ट्रिया येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर करण्यात आले. त्यातून ‘आहाराची आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मकता’ ठरवणारे घटक लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘बहुतांश वेळा आपण आहाराची चव किंवा त्यातील पोषण मूल्ये या निकषांवर त्याची निवड करतो; परंतु ‘त्याचा आपल्यावर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होणार’, याविषयी कोणीही विचार करत नाही; कारण ते आपल्याला कधीही शिकवलेले नाही. आहाराचे घटक सात्त्विक असणे, तसेच स्वयंपाक करणारी व्यक्ती, स्वयंपाकाची प्रक्रिया आणि स्वयंपाकघराचे वातावरण यांचा जेवणाची सकारात्मकता किंवा नकारात्मकता यांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो’, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते ‘सेकंड ग्लोबल समिट ऑन फूड सायन्स आँड न्यूट्रिशन’, या व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘द पल्सस ग्रूप, यू.के.’ यांनी केले होते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन विभागाचे रुपेश लक्ष्मण रेडकर यांनी  याविषयी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, क्लार्क यांनी ‘आपला आहार आपल्या प्रभावळीवर कसा परिणाम करतो’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने हे 82 वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत 15 राष्ट्रीय आणि 66 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यापैकी 9 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट पुरस्कार’ मिळाले आहेत.

श्री. क्लार्क पुढे म्हणाले की, आपला आहार आपल्या प्रभावळीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतो. जेव्हा नकारात्मक परिणाम होतो, तेव्हा शारीरिक स्तरावर सुस्ती, तसेच विविध आजार निर्माण होतात. मानसिक स्तरावर आक्रमक वर्तन, उदासीनता, वैचारिक गोंधळ, निर्णयक्षमतेचा अभाव, असे परिणाम दिसून येतात. त्यानंतर त्यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)) याच्या माध्यमातून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ, त्याचे विविध कच्चे घटक, तसेच हे पदार्थ ग्रहण करणार्‍या व्यक्ती यांविषयी केलेल्या चाचण्यांबद्दल विस्तृत माहिती दिली.

  • मांसाहारी पदार्थांच्या कोणताही घटकामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्यांच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मटनामध्ये 194.6 मीटर, कोंबडीचे मांसामध्ये 188.5 मीटर, बांगड्यात (माशाचा प्रकार) 36.6 मीटर, अंड्यामध्ये 17 मीटर होती. शाकाहारी पदार्थांच्या सर्व घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली, त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जाही होती; परंतु मांसाहारी पदार्थांच्या घटकांच्या तुलनेत अगदी कमी प्रमाणात होती. वरील पदार्थ ग्रहण करणार्‍या व्यक्तीचे पदार्थ ग्रहण केल्यानंतर ५ मिनिटांनी घेतलेल्या चाचणीत त्याची नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळले. विविध पदार्थ ग्रहण केल्यानंतर त्याची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘चिकन फ्राय’मध्ये 130 मीटर, ‘फिश प्राय’मध्ये 127 मीटर, ‘आमलेट’मध्ये 88 मीटर, ‘मिक्स्ड व्हेजिटेबल’मध्ये 73 मीटर होती.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यायाच्या संशोधन केंद्रातील स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या संत साधिकेने बनवलेल्या फ्लावरची सुकी भाजी ग्रहण केल्यावर त्या व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही; परंतु त्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 17.3 मीटर एवढी आढळली. आहारविषयीच्या संशोधनातून स्पष्ट होते की, आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक आहार व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याला हातभार लावतो. यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक आहार, स्वयंपाक करतांना, तसेच आहार ग्रहण करतांना नामजप करणे आवश्यक असते, असे या माहितीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!