नंदुरबार – जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट , कोंबींग, नाकाबंदी सुरु करण्यात येऊन आतापर्यंत एकूण 39 आरोपींना अटक करण्यात आली. 18 दारुबंदीचे गुन्हे दाखल करून 1 लाख 75 हजार 730 रुपये किमतीची देशी विदेशी दारु व बियर असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. पुढील 3 दिवस ऑपरेशन ऑल आऊट (कॉबींग व नाकाबंदी) योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
- ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात 23 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी दरम्यान 113 वाहनांची तपासणी करण्यात येवून 27 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
- नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉनवेलेबल वॉरंटपैकी 70 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करुन एकूण 37 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
- त्यात 11 आरोपी मयत झालेले होते. त्यांचा निश्चीत ठावठिकाणा व नातेवाईक माहिती नसल्यामुळे न्यायालयाकडून त्यांचेविरुध्द् नेहमी वॉरंट काढण्यात येत होते, अशा मयत आरोपींचे नातेवाईक शोधून त्यांचे मयताचे दाखले प्राप्त केले. तसेच 12 आरोपींनी न्यायालयात दंड भरून वॉरंट रद्द केल्याचे या तपासात निष्पन्न झाले.
- त्याचप्रमाणे 63 बेलेबल वॉरंटची व 92 समन्सची बजावणी करण्यात आली. यामध्ये नंदुरबार शहर, शहादा पोलीस ठाण्याचे अधिका-यांनी नॉनवेलेबल वॉरंट बजाविण्यात पुढाकार घेतला.
- नंदुरबार जिल्ह्यातील 81 हिस्ट्रीशीटर्स तपासण्यात आले. तसेच 62 हॉटेल / ढाबे / लॉजेस तपासण्यात आल्या. 18 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
- नंदुरबार येथील पोलीस ठाणे अभिलेखावरील मालमत्ते विरुध्दचा सराईत गुन्हेगार दादाभाई बाळू पाटील वय 26 याचा शोध घेवून त्यास विचारपूस केली असता त्याने दिड ते दोन महिन्यापुर्वी नंदुरबार येथुन एक पाण्याचा टँकर चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सदरचा टँकर हस्तगत करण्यात आला.
- नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे नागरीकांनी याबाबत जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक-2021 व नवरात्रोत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविणेबाबत नियोजन करण्यात आले. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी, हिस्ट्रीशिटर्स, गैंग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले, चोरीच्या वस्तू बाळगणारे रात्रौ संशयीतरीत्या फिरणारे, कारागृहातुन सुटुन आलेले आरोपी, स्टैंडिंग वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट, बेलेबल वॉरंटमधील आरोपीतांचा शोध घेवून जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. एस. एस. सावंत, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करून कारवाई करीत होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा एस. एस. सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमलदार हे करीत आहेत.