ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात 24 तासात 510 वरून 568 वर आलेत. देशात 23 राज्यांमधे याचा प्रसार होत असून देभरातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या 1892 झाली आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात 3 जानेवारी 2022 रोजी रात्री 8 पर्यंतच्या अहवालानुसार एकूण 94 पैकी 7 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यात नंदुरबार येथील 3 व शहादाच्या 4 व्यक्तींचा समावेश आहे. तर रात्री.9.30 वाजेच्या अहवाला नुसार एकूण 94 पैकी 6 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यात नंदुरबारमधील 6 जणांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. शेजारील धुळे जिल्ह्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. याच बरोबर जळगाव जिल्हयातही रूग्णसंख्येचा आलेख चढता आहे. जळगाव जिल्ह्यात ऑगस्टनंतर दुसर्या संसर्गाच्या लाटेतील रूग्ण संख्येची साखळी खंडीत होऊन जवळजवळ जिल्हा संसर्गमुक्त होण्याच्या मार्गावर पोहचला होता. मात्र जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांनतर पुन्हा डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहापासून संसर्ग बाधीत रूग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात सद्यस्थितीत २४ रूग्णांवर उपचार केले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत नमूद केले आहे. परदेशवारी केलेल्या १२४ पैकी ११४ जणांचा संपर्क झालेला आहे. तर १० जणांचा संपर्क झालेला नाही वा त्यांचा ट्रेसही लागलेला नाही. तथापि यातील एकही नागरिकाचा रूग्ण तपासणी अहवाल पॉझिटिव्ह नाही.
कोविड 19 अपडेट
भारतात सध्या 1,71,830 सक्रिय रुग्ण आहेत
सक्रिय प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी 1 टक्क्यांहून कमी आहेत, सध्या 0.49 टक्के आहेत
पुनर्प्राप्ती दर सध्या 98.13 टक्के आहे
गेल्या 24 तासांत 11,007 रुग्ण बरे झाले असून, देशभरात आतापर्यंत एकूण 3,43,06,414 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 37,379 नवीन रुग्ण आढळले आहेत
दैनिक सकारात्मकता दर 3.24 टक्के आहे
साप्ताहिक सकारात्मकता दर सध्या 2.05 टक्के आहे
आतापर्यंत एकूण 68.24 कोटी चाचण्या झाल्या आहेत.
राज्यनिहाय ओमायक्रॉन प्रकरणे
क्रम संख्या | राज्य | ओमायक्रॉन रुग्ण संख्या | बरे होऊन परतलेले /स्थानांतरित मामले |
1 | महाराष्ट्र | 568 | 259 |
2 | दिल्ली | 382 | 57 |
3 | केरल | 185 | 58 |
4 | राजस्थान | 174 | 88 |
5 | गुजरात | 152 | 85 |
6 | तमिल नाडु | 121 | 100 |
7 | तेलंगाना | 67 | 27 |
8. | कर्नाटक | 64 | 18 |
9. | हरियाणा | 63 | 40 |
10. | ओडिशा | 37 | 1 |
11. | पश्चिम बंगाल | 20 | 4 |
12. | आंध्र प्रदेश | 17 | 3 |
13. | मध्य प्रदेश | 9 | 9 |
14. | उत्तर प्रदेश | 8 | 4 |
15. | उत्तराखंड | 8 | 5 |
16. | गोवा | 5 | 0 |
17. | चंडीगढ़ | 3 | 2 |
18. | जम्मू-कश्मीर | 3 | 3 |
19. | अंडमान और निकोबार द्वीपसमूह | 2 | 0 |
20. | हिमाचल प्रदेश | 1 | 1 |
21. | लद्दाख | 1 | 1 |
22. | मणिपुर | 1 | 0 |
23. | पंजाब | 1 | 1 |
एकूण | 1,892 | 766 |