नंदुरबार – शिरपुर येथील आर सी पटेल संकुल व किसान विद्या प्रसारक संस्था संकुल येथे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना संसदरत्न खासदार डॉ.हिनाताई गावीत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या *परीक्षा पे चर्चा* अभियानांतर्गत संसदरत्न खासदार डॉ.हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली *शिरपुर* येथील आर सी पटेल संकुल व किसान विद्या प्रसारक संस्था संकुल येथे हे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना *संसदरत्न खासदार डॉ.हिनाताई गावीत* यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी भाषणातून संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आमदार अमरीश भाई पटेल यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला तसेच निकोप स्पर्धा करून कलात्मक प्रगती करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संदेश दिला.
प्रसंगी *आ.अमरीशभाई पटेल आ.काशिनाथ पावरा* व पदाधिकारी उपस्थित होते