गणेश मिरवणुका ‘डीजे’ मुक्त! अधीक्षकांनी आवाहन करताच डॉल्बी डीजे सिस्टीम स्वेच्छेने पोलिसांकडे जमा

नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी डी. जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.. गणेशोत्सव काळात डी. जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे. डी. जे. व डॉल्बीचा वापर केल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जाहीर केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत  डी. जे. व डॉल्बी असोसिएशनने पुढाकार घेत नंदुरबार शहरातील 13 डी. जे. व डॉल्बी सिस्टिम स्वेच्छेने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे जमा केल्या.
 डी. जे. व डॉल्बी सिस्टीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे ध्वनी प्रदुषण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डी. जे. व डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे वृध्द् इसम आजारी इसम, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी दिनांक 31/08/2022 ते दिनांक 09/09/2022 पावेतो डी. जे. व डॉल्बी सिस्टिमवर बंदी घातलेली आहे व त्याबाबतचे सविस्तर आदेश देखील निर्गमीत केलेले आहेत.
 याला अनुषंगूनच नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात साजरे झालेले रमजान ईद, शिवजयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, रामनवमी, मोहरम, विश्व आदिवासी गौरव दिन तसेच आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव काळात डी. जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवानास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी. जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील 235 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशंसापत्र देवून सत्कार करण्यात आला होता. डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती.
नंदुरबार शहरातील 13 डी. जे. व डॉल्बी सिस्टिम वाहनासह नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे स्वेच्छेने जमा केले. तसेच वाहनांच्या चाव्या नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचेकडे डी. जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पंडीत माळी यांनी सुपुर्त केलेल्या आहेत..
सदर कार्यक्रमाच्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, डी. जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पंडित माळी, उपाध्यक्ष श्री. किरण बडगुजर, सचिव श्री. राकेश कापडे, मातोश्री साऊंडचे मालक श्री. योगेश बारी, राजज्यांती साऊंडचे मालक श्री. धिरज कुंवर, शिव मल्हार साऊंडचे मालक श्री. गणेश सुळ, ND साऊंडचे मालक श्री. भूषण कोळी, समर्थ साऊंडचे मालक श्री. वरुण चव्हाण, पवन साऊंडचे मालक श्री. पवन कोकणी, माऊली साऊंडचे मालक श्री. नितीन कुंभार, मारुती राया साऊंडचे मालक श्री. घारु कोळी, वैष्णवी साऊंडचे मालक श्री. संकेत भोईटे, साई समर्थ साऊंडचे मालक श्री. निलेश मराठे, साई सरकार साऊंडचे मालक श्री. शैलेश मराठे, रिद्धी सिद्धी साऊंडचे मालक श्री. खंडु माळी, विघ्नहर्ता साऊंडचे मालक श्री. बंटी जगताप, मंगलमुर्ती साऊंडचे मालक श्री. राहुल चौधरी इत्यादी उपस्थित होते.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण सरंक्षण कायदा कलम 15 प्रमाणे 5 वर्ष कैदेची किंवा 1,00,000/ (एक लाख रुपये दंड) किंवा दोन्ही शिक्षा होवु शकतात. तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे केल्यास 5000/ | रुपये दंड प्रत्येक दिवसाला व शिक्षा लागल्याच्या 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 | वर्षापर्यंतची शिक्षा होवू शकते, त्यामुळे गणेशोत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ | किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात करु नये, तसे आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564-210100/ 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!