गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क (CCTNS) यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात द्वितीय

नंदुरबार – जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा किंवा अतिदुर्गम जिल्हा म्हणून आहे. असे असतांना देखील नंदुरबार जिल्ह्याने ‘गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा ‘अर्थातच (CCTNS) प्रणाली राबविण्यात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
CCTNS प्रणालीची सुरुवात महाराष्ट्रात सन 2015 मध्ये झाली असून CCTNS प्रणालीत पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन होणाऱ्या प्रत्येक घडामोडींची ऑनलाईन नोंदी घेण्यात येत असते, त्यात प्रथम खबर अहवाल (FIR), स्टेशन डायरी नोंदी, अटक आरोपींच्या नोंदी, तसेच पोलीस ठाण्यात हस्तलिखीत होणाऱ्या सर्व नोंदी ह्या आता CCTNS प्रणालीत संगणकाद्वारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत असतात. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संबंधीत कर्मचाऱ्यांकडुन CCTNS प्रणालीत दैनंदिन डाटा फिडींगचे काम करुन घेत असतात आणि त्यावर प्रत्यक्ष पर्यवेक्षण नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचेकडून होत असते.
गुन्हेगारांवर वचक ते सामाजिक बांधीलकी सोबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला तंत्रज्ञानाला देखील मागे पडू दिलेले नाही. महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 11 पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र शासनाचा सुरु असलेला CCTNS प्रणाली राबविण्यात नंदुरबार जिल्ह्याने 232 पैकी 222 गुण प्राप्त करुन महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. नंदुरबार जिल्ह्यात इंटरनेटचा स्पीड, सुरळीत नसणारा वीज पुरवठा व इतर अत्याधुनिक सुविधा नसतांना देखील CCTNS प्रणाली राबविण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र पोलीस दलात आपली एक नवी ओळख निर्माण केलेली आहे आणि याचे संपूर्ण श्रेय अर्थातच नंदुरबार जिल्हा पोलीसांना जाते.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात CCTNS चे मुख्य सहर असून त्याठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांचे पथक असून पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन ऑनलाईन फिडींगच्या कामावर ते देखरेख ठेवतात. तसेच पोलीस ठाण्याला येणारे तांत्रिक व इतर अडचणीबाबत ते पोलीस ठाण्याला जावून ते सोडवित असतात.
नंदुरबार सारख्या अतिदुर्गम किंवा आदिवासी जिल्ह्यात CCTNS प्रणाली राबवुन ती यशस्वी करणे हे एकप्रकारे नंदुरबार जिल्हा पोलीस दलासाठी आवान होते, कारण नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव, मोलगी, अक्कलकुवा व इतर ग्रामीण भागात इंटरनेटच्या वेची मर्यादा नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांपेक्षा कमी असते, त्यातच वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अशा अनेक अडचणीवर मात करुन पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाची दिलेल्या विहीत वेळेत व जास्तीत जास्त ऑनलाईन फिडींग करुन नंदुरबार जिल्हा CCTNS टीमने जुलै- 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय स्थान पटकावून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. सचिन हिरे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारचे पोलीस निर्माक्षक श्री. रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, पोलीस नाईका राजेंद्र मोरे व नंदुरबार जिल्ह्यातील CCTNS चे काम पाहणारे पोलीस अमलदार यांचे पथकाने केलेली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व टीमचे अभिनंदन करुन त्यांना रोख बक्षीस देखील जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!