नंदुरबार : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 4 हजार 279 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांना दरमहा एक किलो साखर 20 रुपये किलो प्रमाणे मिळणार आहे. ही एक किलो साखर पॅकिंग स्वरुपात माहे फेब्रुवारी 2022 पासून स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध करुन दिलेली असून जिल्ह्यातील सर्व अंत्योदय कार्डधारकांनी दुकानदारांकडे साखरेची मागणी करुन साखर प्राप्त करुन घ्यावी व त्याबद्दल रितसर पावती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.