गोवंश सुरक्षेचा मुद्दा आता तरी सर्वमान्य व्हावा.. 

वाचकांचं मत :
प्रयागराज : वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गाय ही एकमात्र पशू आहे जी ऑक्सिजन घेते आणि सोडते. गायीच्या दुधासून दही, तूप आणि मूत्र-गोबरपासून बनवले जाणारे पंचगव्य अनेक असाध्य रोगांत फायदेशीर ठरतात, अशी टिप्पणी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने केल्याचे वृत्त वाचनात आले. ‘गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केलं जावं’ अशीही टीपणी न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी याचिकाकर्ते जावेद याचा जामीन अर्ज फेटाळून लावताना केली. हे पहाता गो वंश सुरक्षित राखण्याचा आणि त्यांची हत्या थांबविण्याचा मुद्दा आता तरी सर्वमान्य होणे अपेक्षित आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, गायीत ३३ कोटी देवी देवतांचा अधिवास आहे. ऋग्वेदात अघन्या, यजुर्वेदात गौर अनुपमेय आणि अथर्वेदात संपत्तींचं घर असा गायीचा उल्लेख करण्यात आलाय. कृष्णालाही सगळं ज्ञान गौरचरणीच प्राप्त झालं, असंही यावेळी न्यायालयानं म्हटलंय.
एका गायीला किंवा बैलाला मारणं हे एका मनुष्याच्या वधाप्रमाणे असल्याचं ईसा मसीहानं म्हटलं आहे. बाळ गंगाधर टिळक यांनीही ‘मला मारा परंतु, गायीवर हात उचलू नका’ असं म्हटलं होतं. पंडित मदन मोहन मालवीय यांनीही संपूर्ण गोहत्येचा निषेध करण्याचं समर्थन केलं होतं. गौतम बुद्धांनी गायींना मनुष्याचा मित्र मानलं होतं. तर जैनांनी गायीला स्वर्ग म्हटलंय, अशा उदाहरणांचाही आधार न्यायालयानं आपल्या निर्णयात घेतला.
भारतीय संविधानाच्या निर्माणाच्या वेळीही संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी गोरक्षेला मूलभूत हक्काच्या स्वरुपात सामील करण्याचा उल्लेख केला होता. हिंदू शेकडो वर्षांपासून गायीची पूजाअर्चना करत आले आहेत. ही गोष्ट गैर-हिंदूही चांगल्याच पद्धतीनं समजतात. त्यामुळेच गैर हिंदू नेत्यांनी मुघलकाळातही हिंदू भावनांचा आदर करत गोहत्येचा विरोध केला होता, असंही यावेळी न्यायालयानं म्हटलंय.
न्यायालयानं म्हटलं, आपल्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की देशातील बहुसंख्यांक मुस्लीम नेतृत्व नेहमीच गोहत्येवर देशव्यापी बंदी घालण्याच्या बाजुने राहिलंय. ख्वाजा हसन निजामी यांनी एक आंदोलन चालवलं होतं तसंच त्यांनी ‘तार्क ए गाओ कुशी’ या आपल्या पुस्तकात गोहत्येचा विरोध केला होता. सम्राट अकबर, हुमायू आणि बाबर यांनी आपल्या सत्तेच्या काळात गोहत्या न करण्याचं आवाहन केलं होतं.
‘जमीयत ए उलेमा ए हिंद’चे मौलाना महमूद मदनी यांनी भारतात गोहत्येवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय कायदे आणण्याची मागणी केलीय. हे सगळे संदर्भ लक्षात घेता गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केलं जावं आणि गोसंरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार समजला जाण्याची गरज आहे, असंही म्हणाले. हे सर्व लक्षात घेता गो वंश सुरक्षित राखण्याचा आणि त्यांची हत्या थांबविण्याचा मुद्दा आता तरी सर्वमान्य होणे अपेक्षित आहे.

                               – सराफ पी.आर.

                         औरंगाबाद (संभाजीनगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!