नंदुरबार – ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी प्रणीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे राजमाता जिजाऊ आणि थोर राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. शहरातील माणिक नगर येथील खुशिया वेलनेस सेंटरच्या सभागृहात हा अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे माजी तालुकाध्यक्ष व सेवानिवृत्त शिक्षक श.न. अर्थेकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस ग्राहक पंचायतीच्या विद्यमान नंदुरबार तालुका अध्यक्षा अबोली चंद्रात्रे यांनी पुष्प अर्पण केले. अभिवादन कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, पुनम भावसार, सुरेश जैन, डॉ. गणेश ढोले, बी.डी. गोसावी, शैलेश जाधव, गोरखनाथ बावा, नितीन पाटील, वासुदेव माळी आदी उपस्थित होते.