चालू रेल्वेत महिला प्रवाशी दगावल्याने खळबळ; मृत महिला शिंदखेडा तालुक्यातील

नंदुरबार –  रेल्वेने उधन्याहून दोंडाईचाकडे जाणाऱ्या एका महिला प्रवाशाला खांडबारा रेल्वे स्थानकावर अचानक उलट्या झाल्या व नंतर अकस्मात मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली. नंदुरबार स्थानकावर या महिलेला तपासणीअंती मृत घोषित करण्यात आले. मृत महिला शिंदखेडा तालुक्यातील आहे.
नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऊधना-पाळधी या मेमो ट्रेनने सुमनबाई रोहिदास पाटिल, रा.हातनुर,चिमठाने, ता.शिन्देखेड़ा या प्रवास करीत होत्या. त्या उधना येथून बसल्या होत्या. तथापि मेमो ट्रेन खांडबारा स्थानकावर असताना त्यांना अचानक उलट्या झाल्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या सोबत असलेले सहप्रवासी
धनराज डोंगर पाटिल यांनी मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार स्थानकात ट्रेन पोहोचताच प्रवाशांनी वैद्यकीय सेवेसाठी धावाधाव केली. रेल्वे वैद्यकिय अधिकारी डॉ.आयशा यांनी तातडीने तपासणी केली. तेव्हा त्यांनी त्या महिलेला मृत घोषित केले. रेल्वे पोलीस तसेच स्थानक अधीक्षक प्रमोद ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनीची व्यवस्था केली. या प्रवाशाचा मृत्यू कशामुळे झाला ? प्रवासादरम्यान काही खाण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडली की या महिलेची प्रकृती आधीच बिघडलेली होती ? याचा तपास अधिकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!