नवी दिल्ली: जामीन मंजूर करण्यापूर्वी कोर्टाने आरोपीची पूर्वस्थिती अभ्यासली पाहिजे; असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
एनडीटीव्ही ने याविषयी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या खंडपीठाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हत्या आणि गुन्हेगारी षडयंत्राच्या खटल्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीला दिलेला जामीन रद्द करताना ही टिप्पणी केली. एखाद्या आरोपीचा रेकॉर्ड खराब आहे का आणि तो जामिनावर असताना गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे का हे शोधण्यासाठी कोर्टाने त्याच्या पूर्वस्थितीची चौकशी केली पाहिजे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
जामीन अर्जावर निर्णय देताना आरोपांचे स्वरूप आणि पुरावे देखील महत्त्वाचे घटक आहेत, असे खंडपीठाने सांगितले.