(एनडीबी न्यूज वर्ल्ड टीमकडून)
नंदुरबार : किटकनाशकांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, मोहिम अधिकारी एम.जी.विसपुते, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, कृषि अधिकारी वाय.एस.हिवराळे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत किटनाशकांची हाताळणी, किटनाशकामुळे विषबाधा होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी विविध बाबींसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सुरक्षा कीटचे महत्व समजावून सांगितले जाणार आहे. मोहिमेअंतर्गत 8 किटकनाशक उत्पादक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी अदामा इंडिया प्रा.लि. कंपनीस नोडल कंपनी नेमण्यात आले आहे.
00000