नंदुरबार – महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवस्थान शनिमांडळ येथील श्री शनेश्वर मंदिरात जाऊन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी शनी अमावस्येच्या सायंकाळी विधिवत पूजन केले तसेच स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील समस्या जाणून घेतल्या.
शनिवार दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी अमावस्या होती. शनिवारी पडणाऱ्या अमावस्येला म्हणजे शनी अमावस्येला श्री शनेश्वर देवाचे दर्शन घेऊन पूजन करणे अगत्त्याचे मानले जाते. यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातून नंदुरबार तालुक्यातील प्रसिद्ध शनिमांडळ येथे भाविक गर्दी करत असतात. दरम्यान, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित यांनी सुद्धा तिथे जाऊन दर्शन घेतले. शनिमांडळ येथील शनिमंदिरात शनिअमावस्या निमित्त जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते पुजा करुन आरती देखील करण्यात आली.
जि.प.सदस्य शांताराम पाटील, शनेश्वर ट्रस्ट अध्यक्ष दिलीप पाटील,युवराज पाटील,विश्वास पाटील,भरत राजपूत,लोटन पाटील,रमेश धोबी,भाईदास सावंत,नाना राजपूत,आनंदा पाटील,युवराज खैरनार,रावसाहेब माळी,प्रकाश भिल,भटू धनगर,जगदीश पाटील,महेंद्र राजपूत,दादा पाटील,विवेक पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.