जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक: मतदारसंघापुरताच निवडणूक आचारसंहिता लागू

 

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परीषद अंतर्गत 11 निवडणुक विभाग आणि शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीच्या एकूण 14 निर्वाचक गणासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होणार असून संबंधित मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. या निवडणुकीकरिता आचारसंहिता जरी संबंधित मतदारसंघात लागू झालेली असली तरी पोट निवडणुक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय, कोणतीही कृती, घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण गुन्हा आहे याची नोंद घ्यावी. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!