नंदुरबार – सन २०२२ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १२३ महिला व पुरुष बेपत्ता इ आलेले होते त्याबाबत संबंधीत पोलीस ठाण्याला मिसिंग या शिर्षकाखाली नोंद घेण्यात आलेली होती. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील मिसिंग व बेपत्ता बालकांचा आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील मिसिंग केसेसमध्ये महिला व बालक मिळून येण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मिसिंग केसेसमधील महिला व बालककांना शोधून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२२ पासून या मिसिंग डेस्कमुळे बेपत्ता बालके, महिलापैकी २५ मिसिंग महिला व ०३ बालके यांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे. मिसिंग डेस्कमुळे नंदुरबार शहर येथील ०३, उपनगर ०१, विसरवाडी ०२, नवापुर ०३ शहादा ०६, सारंगखेडा ०६, अक्कलकुवा ०२ तळोदा ०२ अशा एकूण २५ मिसिंग व्यक्तींचा शोध स्थापन करण्यात आलेल्या मिसिंग डेस्ककडून घेण्यात आला. तसेच १ जानेवारी २०२२ मध्ये पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ५४ महिला व ०६ बालक असे १ जानेवारी २०२२ पासून एकुण ७९ मिसिंग महिला व ०९ बेपत्ता बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील मिसिंग डेस्कचे अंमलदार सहा. पोलीस उप निरीक्षक श्री भगवान धात्रक हे बेपत्ता बालके व महिला यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व वेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमांबाबत माहिती घेवून ते मिळून येण्याकरीता प्रयत्न केले जातात. गुन्हे तपासा बरोबरच बेपत्ता बालके व महिला यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्न करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेपत्ता बालके व महिला मिळुन येण्यास नंदुरबार पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार व पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, सहा.पो उप निरीक्षक भगवान धात्रक हे काम करीत आहेत.