जिल्हा पोलीस दलाच्या “डीजे-डॉल्बी मुक्त” उपक्रमाचे पालकमंत्री डॉ. गावित यांनी केले कौतुक

 

नंदुरबार – जिल्ह्यातील विविध जाती, धर्माचे लोक एकत्र राहातात आणि एकमेकांच्या सण उत्सावात सहभागी होवून सोहार्दाचे व शांततेचे वातावरण राखतात, ही अभिमानाची बाब आहे, असं सांगतानाच आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जिल्हा पोलीस दल राबवित असलेल्या डी. जे. डॉल्बीमुक्त उपक्रमाचे कौतुक केले.

मागील वर्षी जिल्ह्यातील गणेश मंडळानी न वाजविता पर्यावरणपूरक डी. जे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांचा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा पोलीस दल आयोजित या कार्यक्रमासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील हे देखील उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मागील वर्षी एका महत्वाच्या अभियानाची सुरुवात केली होती. सण उत्सव काळात डी. जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या त्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून उत्सव साजरे केले. त्यामुळेडी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री. विजयकुमार गावित यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले की, कोणताही सण उत्सव अशांततेच्या वातावरणात पार पडू नये. त्यामुळे दुरावा निर्माण होत असतो. दुरावा निर्माण होण्यासाठी वेळ लागत नाही मात्र जवळ येण्यासाठी खूप वेळ लागत असतो. शहरातील मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयामुळे निश्चितच जातीय सलोख्याचे वातावरण राहिल.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री बी. जी. शेखर पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात, पर्यावरणाची काळजी घेणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न देखील केले पाहिजे. डी. जे. व डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे याचा त्यांना सार्थ अभिमान असून त्याबाबत आभार व्यक्त केले.

यांचा झाला सत्कार

नदुरबार शहरातील साक्री नाक्याचा राजा गणेश मित्र मंडळ, नंदुरबार तालुका पेलीस ठाणे हद्दीतील नवनिर्माण गणेश मित्र मंडळ, आष्टे, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानाचा निळकंठ गणपती, नंदुरबार, वनीता विद्यालय गणेश मित्र मंडळ नवापूर, श्री. राम गणेश मित्र मंडळ, विसरवाडी , तुप बाजार गणेश मित्र मंडळ, शहादा, विठ्ठल रुखमाई गणेश मित्र मंडळ, म्हसावद, भोईराज गणेश मित्र मंडळ, सारंगखेडा, सातपुडा तरुण गणेश मित्र मंडळ, धडगांव, नवयुवक गणेश मित्र मंडळ, अक्कलकुवा, क्षत्रिय माळी गणेश मित्र मंडळ तळोदा, सार्वजनिक दादा गणेश मित्र मंडळ, मोलगी यांचा तसेच शहरातील माळीवाडा गणेश मंडळाचा विशेष सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी अनंत चतुदर्शच्या दिवशी ईद-ए-मिलादचा सण साजरा न करता दिनांक 01/09/2023 रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील सिरत कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. एजाज बागवान व सहाकारी सदस्य यांचा देखील विशेष सत्कार पालकमंत्र्यांचा हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार व जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे सुमारे एक ते दीड हजार पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!