नंदुरबार – स्त्री ने स्वत्वाचा शोध घ्यावा -चांदणी सपकाळे
नंदुरबार-स्त्री ने स्वत्वाचा शोध घेतला तरच ती स्वतः चे प्रश्न स्वतः सोडविण्यासाठी सक्षम होईल असे प्रतिपादन प्रा.चांदणी सपकाळे यांनी आज ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात बोलताना केले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज एका कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.एस.के.चौधरी होते.
यावेळी प्रा.चांदणी सपकाळे यांनी आजवर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचे दाखले दिले.यावेळी प्रा.सौ.वर्षा घासकडबी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्राचीन काळापासून चालत आलेल्या समाजव्यवस्थेत फारसा बदल झालेला नाही म्हणून आजही स्त्री वर अन्याय अत्याचार होतात ही वस्तुस्थिती आहे पण त्यासाठी महिलाच महिलेची संरक्षक बनणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा.एस के चौधरी यांनी सांगितले की, न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहण्यापेक्षा महिलांनीच महिलांच्या संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे.अभ्यासक्रमातसुध्दा महिलांच्या संरक्षणासाठी कायदे उपाय योजना यांचा समावेश करण्यात आला आहे.त्याचे अध्ययन करावे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ.मिनल वसावे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. सौ .वर्षा घासकडबी यांनी केले तर प्रा.सुवर्णा गिरासे यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.