नंदुरबार – चालक बनून ट्रान्सपोर्टचे टँकर चोरायचे व ते परस्पर विकून टाकायचे आणि विकत घेणाऱ्याने टॅंकर चे पार्ट वेगवेगळे करून विल्हेवाट लावायची. अशाा प्रयत्नात असलेल्या दोन टँकर चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. न्यायालयाने या दोघांना 9 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे पोलीस अमलदार विजय डिवरे, यांच्या पथकाने केली असून मा.पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करून तपास पथकास बक्षीस जाहीर केले आहे.
या विषयी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुनिलसिंग रघुविरसिंग काला रा. धानगाव ता.जि. नांदेड यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. सुनिलसिंग यांनी त्यांच्या मालकीचे 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यावर विविध खांडसरीमधून मळी (मॉलेसीस) भरुन वाहण्यासाठी भाडेतत्वावर लावलले होते. त्या टँकरवर जोवनप्रितसिंग तिरलोकसिंग आणि बलविंदरसिंग बलदेवसिंग दोन्ही रा. अमृतसर पंजाब यांना चालक म्हणून ठेवलेले होते. परंतु दिनांक 26 मार्च 2022 रोजी वरील दोन्ही इसमांनी सुनिलसिंग यांच्या मालकीचे दोन्ही टँकर चोरुन नेल्याची दोन्ही आरोपींविरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळमकर यांनी एक पथक तयार करून तात्काळ पंजाब रवाना केले. पंजाबमधील अमृतसर सारख्या मोठ्या शहरात जावून फक्त नावाने शोध घेण्याचे आकान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमधील अमृतसर, तरण तारण, जिल्ह्यातील मेहता, बटाला, नांगली, पिखीपिड, काले, बियास इत्यादी गावांमध्ये जावून संशयांत दोन्ही आरोपीतांचा ठावठिकाणा शोधला. परंतु शोध लागत नव्हता. दरम्यान, अमृतसर येथे पथकाने संशयीत आरोपीच्या घराच्या आजू-बाजूस वेषांतर करून बातमीदारांचे जाळे निर्माण करून शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याने त्याचे नांव बलविंदरसिंग बलदेवसिंग वय 39 रा. काले ता पिछीपिड जि. तरण तारण पंजाब असे सांगितले. त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याचे सांगितले. याचा शोध घेत असतांना जोवनप्रितसिंग हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहूल लागताच पळून गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही.
बलविंदरसिंग बलदेवसिंग वय-39 रा. काले ता पिखीपिंड जि. तरण तारण पंजाब वास शहादा येथे मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दिनांक 09/02/2022 रोजी पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी नामे बलविंदरसिंग बलदेवसिंग याचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेले 45 लाख रुपये किमतीचे दोन्ही टँकरबाबत विचारपुस कली असता बलविदरसिंग याने ते टैंकर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर ताहराबाद रस्त्यावरील पाटील ढाबा येथे लपवून ठेवले असलेबाबत सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-तान्हाबाद रस्त्यावरील पाटील ढाबा येथे गेले असता पथकाला ढाव्याच्या पाठीमागे दोन्ही टँकर दिसले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील 45 लाख रुपये किमतीचे दोन्ही टकर कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून ताब्यात घेतले फरार आरोपी जोवनप्रितसिंग तरलोकसिंग वास लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे यावेळी पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.