टेमकर यांच्या खुन्यांना फाशी द्या; संतप्त नाभिक समाज बांधवांची मागणी

नंदुरबार – सुनिल टेमकर यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा द्या; अशी मागणी येथील संतप्त नाभिक समाजातून केली जात आहे. ही मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने  देण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी संस्थेचे म्हणणे समजून घेतले. संस्थेने निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील प्रजापत नगर येथील सलून दुकान चालक सुनील सुरेश टेमकर यांच्याकडे आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सुनीलने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने  सुनील टेमकर यांची धारदार हत्याराने हत्या केली. अश्या निर्दयी आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच नाभिक समाजास  ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आले आहे.  नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेचे जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, सचिव अरविंद निकम, सहसचिव शिवाजी मिस्‍तरी, प्रसिद्धीप्रमुख प्रकाश देवरे, उपाध्यक्ष गजेंद्र जाधव, हिमांशू बोरसे, सल्लागार पी टी सोनवणे, प्रभाकर चित्ते, कोषाध्यक्ष छगन भदाणे ,संचालक विजय सोनवणे विजय सैंदाणे नितीन मंडलिक शशिकला सोनवणे अनिल भदाने सुधीर निकम, छगन सूर्यवंशी राजाराम निकम, प्रवीण वरसाळे, अनिता सूर्यवंशी, प्रभाकर बोरसे, प्रदीप सोनवणे, मयूर सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, एकनाथ चित्ते, नरेंद्र महाले, ओंकार शिरसाठ, भाईदास बोरसे, भाऊसाहेब सैदाणे, भालचंद्र जगताप, बापू पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!