नंदुरबार – भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या छोटा हत्तीला अशी काही जोरदार धडक दिली की छोटा हत्तीच्या केबिनमध्ये बसलेले तीनही जण दबले जाऊन चेचले गेले. यात तिघांचा मृत्यू झाला तर 2 गंभीर आहे.
हेमराज शोभाराम अंजगे वय – ३९ रा. साईमोहन सोसायटी बेस्तान, सुरज (गुजरात), मनोज बोखारभाई गाठीया वय – ४२ रा. बेस्तानगाव ता. जि. सुरत (गुजरात), भगवान गोविंदभाई पंचुले वय ४८ पत्ता माहित नाही अशी मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे असल्याचे पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे. अंतिम सोहन अंजगे वय – १० वर्षे रा. हिरापुर जि. खरगोन (मध्यप्रदेश), भोलुभाई (पुर्ण नाव माहित नाही) रा. अंबिका नगर सचिन पारडी सुरत (गुजरात राज्य) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे अॅडमीट असुन औषधोपचार सुरू आहे.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे रविवार रोजी पहाटे हा अपघात झाला. अशोक अजंगे राहणार सुरत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तथापि चालक फरार आहेआहे. फिर्यादी यांचा लहान भाऊ हेमराज शोभाराम अंजगे हा त्याचे मालकीचे छोटा हत्ती मालवाहु टेम्पो क्र. GJ – ०५ BX- ४४८३ ने नातेवाईकांसह मध्य प्रदेशातून शहादा मार्गे सुरत येथे परत येत होता. त्यावेळी प्रकाशा कडून शहादा कडे जाणारा ट्रक क्र. MP- ०९ HH- ५५११ बेदरकापणे भरधाव वेगाने चालून आला आणि शहादा प्रकाशा रोड वरील निर्मल हॉटेल समोर रस्त्यावर समोरुन टॅम्पोला ठोस मारुन अपघात केला. भरधाव ट्रकवर धडकली. ट्रक भरधाव असल्याने रिक्षाच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामुळे पुढे बसलेले तिघेजण चेपले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काढतानादेखील मदत करणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत होते. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ट्रकमध्ये अडकलेल्या छोट्या मिनी ट्रकला बाहेर काढावे लागले अशी परिस्थिती होती.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मयत हे सुरत व मध्य प्रदेशातील गोंदिया येथील असल्याने त्यांचे नातेवाईक सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचू शकले नव्हते. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रकाशात दुरुक्षेत्राचे संदीप खंदारे रामा वाळवी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाई पटेल आदींनी नियंत्रण केले.
दरम्यान फिर्यादीत म्हटले आहे की टॅम्पो चालवित असलेला फिर्यादीचा लहान भाऊ हेमराज व टॅम्पो मध्ये बसलेले मनोज गाठीया भगवान पंचुले यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचे मरणास व पुतण्या अंतिम अंजने सचिन पारडी यांचे दुखापतीस कारणीभूत झाला व फिर्यादी यांचे भावाचे छोटा हत्ती टॅम्पोचे व स्वता चालवित असलेल्या ट्रकचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे तसेच अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोसई अभिजीत अहिरे अधिक तपास करीत आहेत.