नंदुरबार – डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमासाठी पीसीआय अंतर्गत आता एक्झिट एक्झामिनेशन टेस्ट (चाचणी) घेण्यात येणार आहे. मात्र डिप्लोमा इन फार्मसीमध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा चाचणीला आणि ‘एक्झाम पॅटर्न’ला मात्र विरोध केला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांनी डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन विनिमय तात्काळ रद्द करावे. तसेच परीक्षा पॅटर्नमधे बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याविषयी विद्यार्थ्यांच्या वतीने खासदार डॉक्टर हिना गावित यांना निवेदन देण्यात आले.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक, शैक्षणिक, मानसिक, नुकसान होणार असून या निर्णयाविरोधात डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात दिसून येत आहेत. अशा आशयाचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले. माननीय राष्ट्रपती महोदय PCI अंतर्गत आपल्याला दिलेला अभिप्राय अतिशय चुकीच्या पद्धतीने, डिप्लोमा इन फार्मसी च्या विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता. चालू शैक्षणिक वर्षात लादण्याचा प्रकार केला आहे. वास्तविक पाहता हा निर्णय बी फार्मसी, व डॉक्टर यांना लागू करायला पाहिजे होता. परंतु डिप्लोमा इन फार्मसी अशा मोजका अभ्यासक्रम असणाऱ्या कोर्सला एक्झिट एक्झामिनेशन लावणे निव्वळ मूर्खपणा असल्याचे लक्षणें आहेत. त्यामुळे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया ही प्रतिष्ठित संस्था असून, अशा संस्थांकडून ही चूक होणे अपेक्षित नाही.
डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणारच आहे. परंतु त्यांनी दोन वर्ष डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमात लावलेला आपला अमुलाग्र वेळ, फोर्स ला लागलेली फी अशा प्रकारे विद्यार्थ्याचे आर्थिक, शैक्षणिक, मानसिक नुकसान निश्चितच होणार आहे. म्हणून विद्यार्थी विरोधी अशा जाचक एक्झिट एक्झामिनेशन निर्णयाला तात्काळ रद्द करण्याची मागणी करत आहेत.