नंदुरबार – ग्रामीण भागात केलेल्या रुग्णसेवेची दखल घेत येथील बाळू अभिमन्यू बडगुजर यांना खान्देश गौरव अवॉर्ड देवून गौरविण्यात आले. डॉ.बडगुजर विरदेल (ता.शिंदखेडा) येथील रहिवासी असून सध्या ते नंदुरबार येथे वास्तव्यास आहेत.
आयुष शास्रातील जागतिक संघटना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयमा खान्देश गौरव अवॉर्ड वितरण कार्यक्रम झाला. मागील १५ वर्षापासून ते रुमकीतलाव (ता.निझर) या आदिवासी भागात खाजगी वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. अनेक गरीब, गरजू लोकांना आरोग्य विषयक मदतीचा हात देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत खांदेश गौरव अवॉर्डने सन्मानित करण्यात आल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
वैद्यकीय शास्रातील चिकित्सकांच्या योगदानाची दखल घेत आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्यावतीने जळगाव येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, मंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेश पाटील, महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते खान्देश गौरव अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश जी. कराळे, उपाध्यक्ष डॉ.नितीन राजे पाटील, डॉ.राकेश झोपे, डॉ.हर्षल बोरोले, डॉ.सौ.लिना बोरोले, डॉ.विरेंद्रसिंग गिरासे व सर्व राष्ट्रीय व राज्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देशातील चिकित्सकांना सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी खान्देश उत्तर महाराष्ट्र आयुष मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व प्रॅक्टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.