तक्रार नोंदवायचीय? उमेदवारांची सर्व माहिती हवी? सर्व उपलब्ध आहे ‘या’ ॲपवर

नंदुरबार – निवडणूक संदर्भात आक्षेपार्ह फोटो किंवा विडिओ आढळल्यास सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा तक्रार नोंदवता येणार असून खास त्यासाठी  सी-व्हिजील (C-vigil) अॅप ची सोय निवडणूक आयोगाने केली आहे. आक्षेपार्ह फोटो अथवा माहिती विषयीची तक्रार या ॲपद्वारे कोणीही नोंदवू शकतो.
अशा तक्रारींवर फ्लाईंग स्कॉड च्या माध्यमातून त्वरित कार्यवाही केली जाऊ शकते आणि तीही अवघ्या 100 मिनीटांच्या आत!  100 मिनीटांच्या आत तक्रार निकाली काढण्यात येईल, असे शासकीय माहितीत जाहीर करण्यात आले आहे. सदर अॅप हे गुगल प्ले स्टोअर व एप्पल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.
 इतकेच नाही तर आपल्या भागातील उमेदवारांची संपत्ती किती त्यांचे शिक्षण काय त्यांचे व्यवसाय कोणते वगैरे माहिती जाणून घ्यायची असल्यास नागरिकांना कॅंडिडेट एफिडेविट पोर्टल (Candidate Affidavit Portal) वर पाहता येईल. निवडणूक आयोगाने तशी सोय केली आहे. Candidate Affidavit Portal वर निवडणुक लढवणा-या उमेदवारांची संपुर्ण माहिती असलेली यादी, उमेदवारांच् या नामनिर्देशन पत्राची माहिती, उमेदवारांची शपथपत्रे इत्यादी बाबतची माहिती सर्वसामान्य नागरीकांना या पोर्टलवर पाहता येईल. (https//affidavit.eci.gov.in/) उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा पाहता येईल. त्यासाठी KYC App (Know Your Candidate) कार्यरत करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे KYC अॅप तयार करण् यात आले असुन यामध्ये नागरीकांना उमेदवारांचे गुन्हेगारी विषयक अहवाल या अॅपच् या माध् यमातुन पाहता येतील.
सुविधा (SUVIDHA) या अॅपद्वारे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि विविध परवानग्या मिळविण्याकरीता ऑनलाइन अर्ज करता येतील. ETPBMS:- सैन्य दलातील मतदारांकरीता ETPBMS या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतपत्रिका पाठविण्यात येणार आहे. अशा मतपत्रिका मतदान झाल्या नंतर सैन्य दलातील मतदान पोस्टाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठविल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!