तब्बल बारा वर्षे रखडलेल्या पुलाला झटपट दिला 45 कोटी रुपयांचा निधी

नंदुरबार – दुर्गम आदिवासी भागातील दळणवळण आणि विकास या दृष्टीने महत्त्वाचा असलेला धडगाव तालुक्यातील बिलगाव आणि सावऱ्या दिगर गावांना जोडणारा महत्त्वाचा उदय नदीवरील पूल मागील दहा ते बारा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत रखडला होता. त्या पुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जातीने दखल घेऊन सुमारे 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यामुळे दुर्गम भागातील विकासाला चालना मिळणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी मुंबईत देवगिरी या शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन दुर्गम आदिवासी जनतेच्या वतीने विशेष आभार मानले.
पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, शासन दरबारी असंख्य वेळा पाठपुरावा केल्यानंतरही निधी अभावी काम अपूर्ण अवस्थेत होते. परंतु दिनांक 15 जून 2023 रोजी नामदार उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री.अभिजीतदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी ही बाब नामदार श्री.अजित दादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेतून सदर पुलाचे महत्त्व आणि प्रश्नाचे गांभीर्य नामदार श्री.अजित दादा यांना समजले. दरम्यानच्या काळात नामदार श्री.अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाते आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री अभिजीत दादा मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सिताराम पावरा यांनी  नामदार श्री.अजित दादा पवार यांच्याकडे पुनश्च या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्या पाठपुरावास प्रतिसाद देत नामदार  श्री अजित दादा पवार यांनी त्वरित 45 कोटीचा निधी या उदय नदीवरच्या पुलासाठी  मंजूर करून लवकरात लवकर सदर पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकारी यांना दिल्या.
 त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री.अभिजीत दादा मोरे यांनी नामदार श्री अजित दादा पवार यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबई येथे भेट घेऊन धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!